आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्णांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले:शिर्डीच्या दानात 83% घट, मात्र सेवेत कमतरता नाही; 7 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना केले बरे

अहमदनगर (अक्षय बाजपेयी/ नवनाथ दिघे)14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भक्त नाही तर रुग्णांच्या रांगा, राहणे- खाणे सर्व मोफत

कोरोना महामारी दरम्यान देशातील अनेक धार्मिक स्थळांनी आपले दरवाजे रुग्णांसाठी खुले केले. काही मंदिरांचेच रुपांतर रुग्णालयात करण्यात आले तर कुठे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले. आम्ही अशाच धार्मिक स्थळांविषयी सांगत आहोत. आज पहिला रिपोर्ट शिर्डीमधून...

शिर्डी ट्रस्टला मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 83% कमी दान मिळाले असेल मात्र सेवेमध्ये कोणतीही कमतरता नाही. साई ट्रस्ट द्वारे चालवण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयातून आतापर्यंत 7 हजारांपेक्षा जास्त कोरोना पेशेंट बरे झाले आहेत. येथे रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबियांनाही थांबण्याची आणि खाण्या-पिण्याची मोफत व्यवस्था आहे.

भक्त नाही तर रुग्णांच्या रांगा, राहणे- खाणे सर्व मोफत
शिर्डी साई मंदिरात 2018 मध्ये 1.65 कोटी भक्त दर्शनासाठी पोहोचले होते. 2019 मध्ये 1.57 कोटी भक्तांनी दर्शन घेतले. मात्र 2020 मध्ये कोरोनाच्या प्रकोपामुळे मंदीर बंद करावे लागले. पहिल्या लाटेनंतर जेव्हा मंदीर उघडले तेव्हा 16 नोव्हेंबरपासून 21 डिसेंबरच्या दरम्यान 5.74 लाख भक्तांनी दर्शन घेतले. 2021 मध्ये 1 जानेवारीपासून 5 एप्रिल या काळात भक्तांचा आकडा जवळपास 62 हजारच होता. कोरोना महामारी पाहता ट्रस्टने एप्रिल-2020 मध्ये कोविड रुग्णालय बनवले आणि येथे रुग्णांवर मोफत उपचार करण्यास सुरुवात केली.

एप्रिल-2020 पासून आतापर्यंत बाबांच्या मंदिरातून 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन गेले आहेत. ट्रस्टची जी टीम पहिले भक्तांच्या सेवेत तैनात होती, आता ती रुग्णांच्या सेवेत आहे. रुग्णालयात जवळपास तीन हजार कर्मचारी सेवा देत आहेत.

कोविड रुग्णांसाठी सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसह जनरल हॉस्पिटलमध्येही उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री साई बाबा संस्थान ट्रस्टचे सीईओ कान्हुराज हरिश्चंद्र बागते यांनी सांगितले की, 'आम्ही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करत आहोत. मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये जर थोडे शुक्ल एखाद्या सुविधेसाठी घेतले तरीही त्याला राज्य किंवा केंद्र सरकारच्या स्किमच्या माध्यमातून कम्पनशेट केले जाऊ शकते. यामुळे रुग्णावर कोणत्याही प्रकारचा भार येत नाही.'

ते म्हणतात की, 'शिर्डीहून पाच रेल्वे गाड्यांमधून लाक रवाना झाले, आम्ही सर्वांना जेवणाचे पॉकेट दिले. हजारो लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसोबत बसने त्यांच्या घरी रवाना करण्यात आले. क्वारंटाइन सेंटर, आयसोलेशन सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आम्ही गेल्या वर्षापासूनच चालवत आहोत. जोपर्यंत कोरोना संक्रमित येत आहेत, तोपर्यंत ही सुविधा जारी राहील. '

640 बेडचे हॉस्पिटल, 140 ऑक्सिजन बेड
शिर्डी ट्रस्टने 640 बेडचे कोविड रुग्णालय तयार केले आहे. यामध्ये 10 ऑक्सिजन बेड आहे आणि 20 व्हेंटिलेटर बेड आहे. खरेतर कोविडसाठी एकूण तीन जागांवर व्यवस्था करण्यात आली आहे. तिन्ही जागा एकत्र केल्या तर जवळपास दिड हजार बेडची सुविधा आहे.

दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले होते की, येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांसमोर संकट उभे आहे. याच्या तीन दिवसांनंतर नीता आंबानी आणि चेन्नईचे केव्ही रमनी यांनी ट्रस्टला 3 कोटी रुपयांचे दान केले. यामुळे ऑक्सिजन प्लांटसह आधुनिक आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करण्यात आली.ऑक्सिजन प्लांटची क्षमता 1200 एलपीएम प्रति मिनिट आहे. येथे उपचार करत असलेल्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांसाठीही मोफत खाण्या-पिण्याची व्यवस्था आहे.

कोरोनात 295 कोटी कमी मिळाले
साई बाबा ट्रस्टला कोरोना काळात 295 कोटी रुपये कमी मिळाले. ट्रस्टला 2018-19 वर्षी 428 कोटींचे दान मिळाले होते. या व्यतिरिक्त 24.795 किलो सोने, 428.555 किलो चांदी मिळाली.

अशा प्रकारे 2019-20 वर्षी 357 कोटी रुपयांचे दान आले. 17.90 कोटी सोने आणि 357.492 किलो चांदी मिळाली. तर कोरोना काळात म्हणजेच 1 एप्रिल 2020 पासून 25 मे 2021 पर्यंत ट्रस्टला 62 कोटी दान ऑनलाइन प्राप्त झाले.

म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 295 कोटींचे दान कमी आले. टक्क्यांमध्ये पाहिले तर जवळपास 83% घट झाली आहे. जवळपास 14 किलो सोने आणि 295 किलो चांदीही कमी मिळाली. ट्रस्टच्या संपत्तीविषयी विषयी बोलायचे झाले तर 31 मार्च 2020 पर्यंत साई संस्थानची एकूण संपत्ती 3013 कोटी रुपये होते.

वर्षरुपयेसोनेचांदी
2018-19428 कोटी24 .795 किलो428.555 किलो
2019-20357 कोटी17.90 किलो357.492 किलो
बातम्या आणखी आहेत...