आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृवृक्ष लागवड‎:विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या‎ हस्ते वांबोरीत मातृवृक्ष लागवड‎

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वांबोरी येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष‎ बाबासाहेब भिटे यांच्या मातोश्री रखमाबाई भिटे यांचे‎ नुकतेच निधन झाले. यानिमित्त विधानसभेतील‎ विरोधी पक्षनेने अजित पवार यांनी भिटे कुटुंबीयांची‎ भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी भिटे यांच्या‎ मातोश्रींच्या स्मरणार्थ मातृवृक्षाची लागवड करण्यात‎ आली. यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे,‎ पक्षाचे सरचिटणीस नितीन बाफना, वांबोरी‎ शहराध्यक्ष प्रशांत नवले, माजी सरपंच किसन जवरे,‎ कृष्णा पटारे, पोपट देवकर आदी उपस्थित होते. पवार‎ यांनी भिटे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.‎ कुटुंबाची विचारपूस केल्यानंतर बाबासाहेब भिटे‎ यांच्या आई रखमाबाई यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...