आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:मुलाच्या वेतनासाठी‎ आईचे उपोषण सुरू‎

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगाव (ता. नगर) येथील‎ तलावातील माशांची राखण‎ करण्यासाठी कामावर ठेवलेल्या‎ मुलाचे १६ महिन्यांचे वेतन ठेकेदाराने‎ दिले नाही. उलट त्याच्याविरुद्ध‎ चोरीची फिर्याद दिली. या प्रकरणाची‎ चौकशी करुन मुलाचे वेतन व न्याय‎ मिळवून देण्याच्या मागणीसाठी‎ कामगार मुलाची आई अनिता भोसले‎ यांनी सोमवारी पोलिस अधीक्षक‎ कार्यालयासमोर उपोषण केले.‎

देऊळगाव येथील तलावातील‎ मासेमारीचा ठेका एका पोलिस‎ कर्मचाऱ्याने घेतला होता. त्याने‎ मुलाला तलावातील मासे राखण‎ करण्यासाठी कामावर ठेवले होते.‎ मात्र, मागणी करुनही ठेकेदाराने पगार‎ न देता खोट्या गुन्ह्यात‎ अडकवण्यासाठी दमबाजी केली.‎ शेवटी पैसे न देता कामावरून हाकलून‎ देत जातीवाचक शिवीगाळ केली.‎

बातम्या आणखी आहेत...