आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:काम करणाऱ्या महिलांइतकीच घरात‎ काम करणारी आईही महत्त्वाची: डोंगरे‎

नगर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात पालकांइतकेच महत्व‎ शिक्षकांनाही आहे. चांगलं ऐेका,‎ चांगलं शिक्षण घ्या. काम करणाऱ्या‎ महिलांइतकीच घरात काम करणारी‎ आपली आईही तितकीच महत्वाची‎ आहे. शाळेत महिलाचा सन्मान‎ होणे, ही वाखाणण्याजोगी बाब‎ असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश‎ चारू विनोद डोंगरे यांनी केले.‎ महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत‎ विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या‎ महिलांचा सन्मान सोहळा‎ आयोजित केला होता.

यावेळी‎ प्रमुख पाहुणे आयुर्वेदाचार्य डॉ.‎ शुभांगी शिंदे, मुख्याध्यापक सुरेश‎ शेवाळे, महिला पोलिस शीतल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाघ, आहारतज्ञ निर्मला‎ गायकवाड, हार्मोनियम वादक‎ स्वाती आंबेकर, ब्युटिशियन‎ कविता भारताल, मनीषा जावळे,‎ स्वच्छता कामगार सुवर्णा वैरागर,‎ खेळाडू सोनाली साबळे, वैष्णवी‎ कुलकर्णी, आदिती मोढवे, पूर्वा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ म्याना, श्रूती मंगलारम, मृणाल‎ गुंजाळ, प्रमिला वाणी, ऋतूजा‎ जावळे आदींचा यावेळी सन्मान‎ करण्यात आला. महिलांच्या हस्ते‎ शाळेच्या आवारात वृक्षारोपण‎ करण्यात आले. प्रास्ताविकात‎ सुरेश शेवाळे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...