आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षा केंद्र:स्पर्धा परीक्षा केंद्र पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली; आयुक्त जावळे यांचा पुढाकार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडी उपनगर परिसरातील महापालिकेचे स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पूर्वीप्रमाणेच मोफत सुविधा देण्यासाठी खासगी व्यवस्थापन संस्था नियुक्त करणे अथवा खासगीकरणातून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षांपासून महापालिकेचा आदर्श उपक्रम असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बंद करण्यात आले आहे. या केंद्रातून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात होते. दरवर्षी ६० विद्यार्थ्यांना परीक्षा घेऊन निवडले जात होते. मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे केंद्र कारण नसताना बंद करण्यात आले. दरम्यानच्या काळात या केंद्र जागेसह भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, तो हाणून पाडण्यात आला. आता आयुक्त जावळे यांनी पुन्हा हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी खाजगी व्यवस्थापन संस्था नियुक्त करणे किंवा संपूर्ण केंद्र खासगीकरणातून चालविण्यास देणे व त्याचा खर्च महापालिकेमार्फत करणे, आदी पर्यायांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र हा महापालिकेचा आदर्श उपक्रम होता यातून गरजू व कुशल विद्यार्थ्यांना चांगली सुविधा देता येऊ शकेल. या केंद्रासाठी सुसज्ज इमारतही उपलब्ध आहे. त्यामुळे खासगी संस्थेच्या सहकार्यातून अथवा बार्टीसारख्या संस्थांची मदत घेऊन हे केंद्र पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...