आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर - मनमाड मार्गासाठी केंद्राकडून 800 कोटींचा निधी:डॉ. सुजय विखेंची माहिती; म्हणाले - जानेवारी महिन्यात होणार कामाला सुरुवात

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या अहमदनगर - मनमाड मार्गाच्या कामासाठी नव्याने केंद्र सरकारने 800 कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी (5 नोव्हेंबर) दिली.

अहमदनगर - मनमाड या मार्गाच्या कामासाठी नव्याने हा आठशे कोटीचा निधी केंद्राने मंजूर केला असून जानेवारी महिन्यात या मार्गाच्या कामाला सुरुवात होईल, असे डॉ.यांनी सांगितले. या मार्गाच्या कामासाठी निधी मिळावा तसेच निविदा प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने नव्याने 800 कोटीचा निधी या मार्गासाठी मंजूर केला आहे असे डॉ. विखे म्हणाले.

रस्ते कामासाठी नव्याने प्रक्रिया

दरम्यान गेल्या तीन वर्षापासून अहमदनगर - मनमाड रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यापूर्वी नगर- मनमाड रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते. त्याने काम अर्धवट सोडले होते. त्यामुळे नगरसह पुणे व दक्षिण भारतातून जाणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. विळद घाट ते सावळी विहीर असे 75 किलोमीटरचे हे काम होते.त्यासाठी 317 कोटी रुपयांचा खर्च होणार होता 2023 पर्यंत हा रस्ता पूर्ण होणार होता. मात्र कंत्राटदार आणि केवळ 7.50 टक्केच या रस्त्याचे काम करून सोडले होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातील अकोले येथे दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 18 जूनला नगर- मनमाड रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी नव्याने प्रक्रिया सुरू झाली होती.

निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण होणार

अहमदनगर- मनमाड या मार्गाचे काम कमी कालावधीत आणि गुणवत्ता पूर्ण पध्दतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने या मार्गाकरीता 800 कोटी रूपयांचा निधी केला असून, त्याची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. असे डॉ. विखे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...