आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये होणार खुला:खासदार डॉ. सुजय विखे यांची माहिती; सुरत - चेन्नई महामार्ग सोलापूर रस्त्याला जोडणार

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहराबाहेरुन जात असलेल्या सुरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत बदल झाला असून, पहिल्या टप्प्यातील नियोजनानुसार हा महामार्ग शहराजवळील चांद बीबी महलाजवळून जाणार होता. मात्र, आता यात बदल करून हा महामार्ग नगर - सोलापूर रस्त्याला जोडणारा आहे. अहमदनगरचा उड्डाणपूल ऑगस्ट महिन्यात होईल, अशी माहिती भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी दिली.

उड्डाणपूल ऑगस्टमध्ये होणार खुला

अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. विखे म्हणाले की, सुरत- चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची राबवण्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, मात्र आपल्याकडे ती नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे भूसंपादनाचे काम रखडले आहे. नगर प्रांतअधिकारी ही भूसंपादनाची प्रक्रिया राबवणार आहे. अहमदनगरच्या उड्डाणपुलाला ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षातही खुला होईल.

उड्डाणपुलाला नाव कोणते?

अहमदनगरच्या उड्डाणपुलाला काय नाव द्यायचे वेगळा विषय आहे. अहमदनगरला अहिल्या देवीनगर नाव देण्याच्या मुद्द्यावर विखे म्हणाले, अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडी आहे. त्यांचे मोठे कार्य आहे. सर्वसामान्यांसमोर हा विषय गेला पाहिजे. त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तारखेवरुन आमदार-खासदारांचे गैरसमज

पत्रकार परिषदेमध्ये अहमदनगरचा उड्डाणपूल प्रत्यक्षात कधी खुला होईल, असे विखे यांना विचारले असता विखे यांनी 24 ऑगस्ट ही तारीख सांगितली. त्यानंतर लगेचच त्यांच्या बाजूला बसलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपुलाच्या तारखेबाबत काही लिहू नका, असे सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले.

बातम्या आणखी आहेत...