आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:बेलापूर-परळी लोहमार्ग सर्वेक्षणासाठी खासदार लोखंडे यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

कुकाणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलापूर-परळी लोहमार्गासाठी तातडीने सर्वे करण्यात येऊन या कामास गती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून व निवेदन देऊन केली. यामुळे बेलापूर-श्रीरामपूर-नेवासे -शेवगाव- गेवराई -बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामास गती मिळणार आहे.

खासदार लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी भेट घेत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या लोहमार्गाची अनेक वर्षांपासूनची मागणी असून या मार्गासाठी ब्रिटिशकालीन सर्व्हेही झाला आहे. यापूर्वीही तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. नव्याने सर्व्हेत बेलापूर, शेवगाव, पाथर्डी-रायमोह-राजुरी-बीड-परळी या लोहमार्गासाठी ३ कोटी रुपयेही केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. बेलापूर-श्रीरामपूर-नेवासे-शेवगाव-गेवराई-बीड-परळी अशाच लोहमार्गासाठी तातडीने सर्व्हे करावा व या कामास वेग द्यावा, त्यामुळे या लोहमार्गामुळे ज्या ज्या तालुक्यातून हा मार्ग जाईल. त्या त्या परिसराचा सुविधा निर्माण होऊन विकास होईल, असेही खासदार लोखंडे यांनी म्ह्टले आहे. खासदार लोखंडे यांनी पुन्हा रेल्वेमंत्र्यांचे बेलापूर-परळी रेल्वेमार्गाकडे लक्ष वेधल्याने या कामास गती मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी, व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

रेल्वेमार्गाच्या कामासाठी पाठपुरावा कौतुकास्पद
अनेक वर्षांपासून लोकांची हा रेल्वेमार्ग होण्याची अपेक्षा असून या मार्गाला वेग दिल्यास जनतेच्या हिताचे मोठे काम होणार आहे. खासदार लोखंडे यांनी या कामाला गती देण्यासाठी सुरू ठेवलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.''
दिनकर गर्जे, अध्यक्ष, सरपंच संघटना नेवासे तालुका.

पाठपुराव्याला यश येईल
बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी ब्रिटिशकालीन सर्व्हे व जमिनीचे संपादनही झालेले असून मातीचा भरावही टाकण्यात आलेला आहे. मात्र इच्छाशक्ती अभावी हा मार्ग रखडला होता. आम्ही या मार्गासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. खासदार लोखंडे यांनी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केल्याने जनतेच्या वतीने त्यांच्या पाठपुराव्यास यश येईल.''
बाबा आरगडे, रेल्वे आंदोलन समिती.

बातम्या आणखी आहेत...