आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:वादग्रस्त विधान करणारे खासदार राऊत यांच्या नावाने दशक्रिया विधी करणार

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राह्मण सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर जोशी यांचा इशारा

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाषणात वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे अखिल ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर आपले हिंदुत्व इतर पक्षाच्या दावणीला बांधून शिवसेनाप्रमुखा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे. अशा शिवसेनेच्या खासदाराने ब्राम्हणांना हिंदुत्व काय असते, हे शिकवू नये. येत्या पाच दिवसांत खासदार राऊत यांनी आपले विधान मागे घेत बिनशर्त माफी मागावी अन्यथा ब्राम्हण समाजाच्या वतीने विनायक राऊत यांच्या नावाने अमरधाम येथे दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिला आहे.

जोशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात खासदार राऊत यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या स्थापनेवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून जे उभे होते, ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह अनेक सेनेचे नेते ब्राम्हण समाजाचे होते. शिवसेनेच्या इतिहासात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या इतकी निष्ठा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने दाखवलेली नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. कदाचित या गोष्टीचा राऊत यांना विसर पडलेला दिसतोय. ब्राम्हण्य माहित नसणाऱ्या खासदार राऊत यांनी पुराणाचा इतिहासाचा अभ्यास करावा, असे त्यांनी म्हटले आहे. राऊत यांनी आपले विधान मागे घेत माफी मागावी अन्यथा राऊत यांच्या नावाने अमरधाम येथे दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा जोशी यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...