आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइलेक्ट्रीक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनांसाठी चार्जिंगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी महावितरणने राज्यात 13 ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु केले. राज्यातील विविध ठिकाणी 2 हजार 375 स्टेशन्स प्रस्तावित आहेत.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय आणि पर्यावरण पुरक म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनापैकी 30 टक्के ही इलेक्ट्रीक वाहने असणार आहेत. आतापर्यंत महावितरणने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे.
कुठे किती स्टेशन्स?
ठाण्यात 5, नवी मुंबई -2, पुणे - 5 आणि नागपूर - 1 अशी एकूण 13 चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. याशिवाय महावितरणमार्फत प्रस्तावित अतिरिक्त 49 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतीपथावर आहेत. यात नवी मुंबई - 10, ठाणे- 6, नाशिक - 2, औरंगाबाद- 2, पुणे- 17, सोलापूर- 2, नागपूर - 6, कोल्हापूर - 2, अमरावती - 2 अशा चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे.
राज्य शासनाने 2021-23 चे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जुलै 2021 रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार सन 2025 पर्यंत राज्यातील इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा दिली जाणार आहे. यात बृहन्मुंबई शहर- 1500, पुणे शहर -500, नागपूर शहर- 150, नाशिक शहर - 100, औरंगाबाद शहर -75, अमरावती -30, सोलापूर -20 अशी एकूण 2 हजार 375 तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.