आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्राहकांनी घेतलेल्या सेवेचे मूल्य दिले पाहिजे, तरच कोणताही व्यवसाय टिकू शकतो. सरकारी कंपन्याही यास अपवाद नाहीत. भारतीय समाजात धर्म, प्रदेश आदी बाबी कळतात. मात्र, ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व कळत नाही. त्यामुळेच महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत कंपनीचे खासगीकरण टाळायचे असेल, तर महावितरणमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेत वाढ केली पाहिजे, वीज बिलाची वसुली केली पाहिजे. ग्राहकांनीही वेळेत बिल भरले पाहिजे. अन्यथा महावितरणचे खासगीकरण टाळणे अशक्य आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.
महावितरणच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील सभागृहात आयोजित ‘विद्युत क्षेत्रातील सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. अहमदनगरसह राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली उपस्थिती लावली होती. अध्यक्षस्थानी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल होते. याप्रसंगी संचालक रवींद्र सावंत, संचालक संजय ताकसांडे, संचालक प्रसाद रेशमे, संचालक डॉ.मुरहरी केळे व संचालक डॉ.नरेश गीते यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिशा व वेग हे ऊर्जा क्षेत्र घडवते
कुबेर म्हणाले, जागतिक स्तरावर कोणत्याही विकासाची दिशा व वेग हे ऊर्जा क्षेत्र घडवत असते. नागरिकांना आहे. भविष्यातील विजेच्या गरजेचे नियोजन करताना मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. राज्याच्या बाबतीत विचार करता लोकांनी बिले न भरल्यास व भूमिका न घेतल्यास लोकांच्या मालकीची असलेली कोणतीच सरकारी कंपनी अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कठोर भूमिका घेऊन वसुली केली पाहिजे, याला कोणताच दुसरा पर्याय नाही. राजकीय भूमिकेतून ग्राहकांकडून वीजबिल वसुलीस विरोध असल्यास सरकारने आपल्या निधीतून महावितरणला पैसे उपलब्ध करून द्यावेत.
व्यावसायिक पद्धतीने काम करावे
कोरोना काळात आणि त्या नंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र आपल्या समोरील आव्हाने अजून संपली नाहीत. अजून व्यावसायिक पद्धतीने काम करावे लागेल. थकीत वीजबिल वसूल करणे, वीजहानी कमी करणे आदी बाबींवर काम करावे लागेल. क्षेत्रीय स्तरावर कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याने अजून प्रयत्न वाढवल्यास हे कामही अवघड नाही, असे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.