आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर महापालिकेच्या बांधकाम विभागात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावे साडेचारशे खोटे टेस्ट रिपोर्ट व खोटे थर्ड पार्टी रिपोर्ट दाखल करून घेत त्याच्या आधारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची बिले काढल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याने मनपा अधिकाऱ्यांऐवजी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी केली आहे.
गैरप्रकाराची चौकशी करा
२०१६ ते २०२० च्या दरम्यान एकूण ४४९ कामांच्या बाबतीत बोगस थर्ड पार्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट उपलब्ध करून कोट्यवधींची बिले काढली आहेत. या गैरप्रकाराबद्दल अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यामार्फत चौकशी सुरू केल्याचे समोर येत आहे. मात्र, पठारे हे मागील पाच वर्षापासून याच महापालिकेत कार्यरत आहेत. ऑफिस रिपोर्ट व धनादेशावर त्यांची सही घेण्यात आलेली आहे. महापालिकेचा बांधकाम विभाग काही काळ त्यांच्याच नियंत्रणाखाली होता. त्यामुळे त्यांच्या मार्फत चौकशी होऊ शकत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.