आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील व उपनगरातील नागरिकांना शहर बस सेवा अत्यंत उपयुक्त व सोयीस्कर आहे. मात्र, बससेवा संध्याकाळी ७ वाजता बंद होत असल्याने नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी यांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे शहरातील बससेवा सकाळी लवकर सुरु करून रात्री १० वाजेपर्यंत चालू ठेवावी, अशा मागणी शहर भाजपच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेनाद्वारे करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, केडगाव मंडल अध्यक्ष पंकज जहागीरदार व सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन दिले.
शहरातील वेगवेगळ्या भागात केडगाव, दूधसागर सोसायटी, मोहिनीनगर, देवी परिसर, तसेच औरंगाबाद रोड वरील महापालिका, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सावेडीतील नित्यसेवा, पाईपलाईन रोड, या भागातील भागात बस सेवा सुरु करावी. बस सेवा सुरु झाल्यावर टप्याटप्याने बसची संख्या वाढविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
परंतु आजपर्यंत बस संख्या वाढविण्यात आली नाही. शहरातील सर्वच भागातील शहर बससेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी शहर सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, रेखा विधाते, बाळासाहेब भुजबळ, राहुल रासकर, श्रीकांत फंड, अॅड. सुनील सूर्यवंशी, महेश निसळ, सुमित बटूळे, सुनील सकट, ज्ञानेश्वर धिरडे, निशांत दातीर, विशाल खैरे, सुधीर मंगलारप, अमित गटणे, श्रीगोपाळ जोशी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.