आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सेवानिवृत्तीनिमित्त मनपा कर्मचारी अरुण भाकरे यांचा सत्कार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपातील वसुली शिपाई अरुण भाकरे हे ३१ मे रोजी २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. निवृत्तीबद्दल त्यांचा मनपाच्या स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक संपत बारस्कर, नागरिक नुरखा पठाण उपस्थित होते. भाकरे हे सुरुवातीला नागापूर ग्रामपंचायतीत शिपाई पदावर कार्यरत होते. मनपा हद्दवाढीत नागापूर ग्रामपंचायत मनपात समाविष्ट झाल्यामुळे भाकरे यांचेही सन १९९९ मध्ये पालिका कर्मचारी म्हणून विलिनीकरण झाले. २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी पाणीपुरवठा विभागात बोल्हेगाव परिसरातही काम केले.

बातम्या आणखी आहेत...