आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनकचरा व्यवस्थापन:शहरात ॲनिमल वेस्ट टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी मनपाचे गस्ती पथक

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व परिसरातील मांस विक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून शहरात उघड्यावर ॲनिमल वेस्ट न टाकण्याबाबत महापालिकेने हमीपत्र घेतले आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रणाखाली चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील स्वच्छता निरीक्षकांनी त्या त्या भागातील १८० दुकानांना भेटी देऊन त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. तसेच रात्रीच्या वेळी उघड्यावर ॲनिमल वेस्ट आणून टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका गस्ती पथक नियुक्त करणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांनी दिली.

ओढे-नाले व मोकळ्या जागांवर ॲनिमल वेस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर दुर्गंधी सुटली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे घनकचरा व्यवस्थापन विभागाला सर्वेक्षण करून कारवाईचे आदेश दिले होते. घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांनी स्वच्छता निरीक्षकांना सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. तसेच उघड्यावर ॲनिमल वेस्ट न टाकण्याबाबत मांस विक्रेत्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार स्वच्छता निरीक्षकांनी मांस विक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. दरम्यान, शहरात एकही कत्तलखाना अधिकृत नसल्याने बेकायदेशीर कत्तलखान्यांच्या ॲनिमल वेस्टचा प्रश्न कायम आहे. अशा बेकायदेशीर कत्तलखान्यांकडून उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या ॲनिमल वेस्ट संदर्भात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी लवकरच महापालिकेचे गस्ती पथक स्थापन करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी कचरा आणून टाकणाऱ्यांवर हे पथक कारवाई करणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शेडाळे यांनी सांगितले.

झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक मांस विक्रेते झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक ८७ छोटे-मोठे मांस विक्रेते आहेत. त्यांच्याकडून उघड्यावर कचरा न टाकण्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. तसेच सावेडी प्रभाग कार्यालयाच्या परिसरातील ४७, बुरुडगाव प्रभाग कार्यालयाच्या परिसरातील २९ व माळीवाडा प्रभाग कार्यालयाच्या परिसरातील १७ अशा १८० विक्रेत्यांकडून हमीपत्र घेऊन ते महापालिकेत जमा करण्यात आले आहेत. या उपरही उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्याचे आदेश आयुक्त जावळे यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...