आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून भोंगळ कारभार सुरू आहे. त्यामुळे मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांच्या सारख्या एखाद्या सक्षम अधिकाऱ्यास नियुक्त करावे, अथवा ही महापालिका त्वरित बरखास्त करून तीन ते चार वर्षासाठी सक्षम प्रशासकाची नियुक्त करावा. ही संस्था वाचविण्यासाठी, शहराच्या कासासाठी मुख्यमंत्री म्हणून आपण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वसंत लोढा यांनी केली आहे.
स्मशानभूमीच्या भूखंड खरेदीच्या प्रकरणामुळे शहराची पूर्ण राज्यात बदनामी झाली आहे. महापालिकेच्या स्वमालकीचे अनेक भूखंड असताना स्मशानभूमीसाठी खाजगी जागा खरेदीचा ठराव सत्ताधाऱ्यांनी ६८ पैकी केवळ १५ नगरसेवकांच्या उपस्थितीत केला. चार एकर जागा चढ्या भावाने ३२ कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या ठरावातून गैव्यवहार उघडकीस आला आहे. त्यामुळे ही महापालिका त्वरित बरखास्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर धनंजय तागडे, भानुदास बेरड, बाळासाहेब भुजबळ, सुनील पंडीत, सचिन पारखी, अशोक कानडे, सोमनाथ चिंतामणी, बाळासाहेब खताडे आदी सदस्यांची नावे आहेत.
अनेक भूखंड नगररचनाच्या सहकार्याने गायब
पाणी योजनांसाठी तब्बल २५० कोटी निधी खर्च होवूनही शहराचा पाणी प्रश्न जैसे थे आहे. सर्वच अंतर्गत रस्ते अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. भाजीमंडई ओस पडली असून भाजीबाजार रस्त्यावर भरत आहे. लोकप्रतिनिधींच्या व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लँड माफियांनी शहरातील ओढे नाले बुजवून जवळपास २०० कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. अनेक भूखंड नगररचना विभागाच्या सहकार्याने गायब झाले आहेत, असा आरोप निवेदनात केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.