आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी:मनपा कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी भरणार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व उपनगर परिसरात स्वच्छतेबाबत तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने व मनपाकडे उपलब्ध सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने महापालिका कंत्राटी पद्धतीने सुमारे ५० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगर परिसरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कचरा संकलन ठेकेदाराकडून घरातून कचरा संकलन केले जाते. मात्र, अनेकवेळा घंटागाड्या दोन-दोन दिवस येत नाहीत. त्यामुळे नागरिक रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकतात. तसेच उपनगर परिसरात सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक रस्त्यांवर दैनंदिन साफसफाई नियमित होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

उपमहापौर गणेश भोसले यांनीही सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मनपाकडून अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...