आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँकेच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत यांची, तर व्हाईस चेअरमनपदी अमित मुथा यांची निवड झाली आहे. नूतन पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांना सहकार अधिकारी विक्रम मुटकुळे, अल्ताफ शेख यांनी सहाय्य केले. याप्रसंगी संचालक तथा माजी चेअरमन आनंदराम मुनोत, माजी व्हा. चेअरमन सुभाष बायड, संचालक कमलेश भंडारी, संजय बोरा, संजय चोपडा, किशोर मुनोत, संजीव गांधी, प्रमिलाताई बोरा, मीनाताई मुनोत, विजय कोथंबिरे, सुभाष भांड, जॉइंट सीईओ नितीन भंडारी आदी उपस्थित होते. चेअरमन मुनोत म्हणाले, मर्चंटस् बँक ही व्यापारी व सर्वसामान्यांची हक्काची बँक आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्षात झालेल्या निवडणुकीत सभासदांनी पुनश्च एकदा जनसेवा मंडळाच्या चांगल्या कारभारावर शिक्कामोर्तब केले आहे. मर्चंटस् बँक अशी बँक आहे की जिथे कर्जासाठी संचालकांकडे ज्याणी गरज नाही. प्रशासकीय विभागच ते काम करून देतो. सभासदांना आजपर्यंत भरघोस भाग नफा दिलेला आहै. अपघात विम्याचा प्रिमियम बँकेने भरला आहे. सभासद कल्याण निधी उभारला आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ठेवीवर अतिरिक्त व्याज देण्यात येत आहे. कर्जाचा व्याजदरही कमी आहे. काळानुरुप अधिकाधिक डिजीटल बँकिंग सेवा देण्यासाठी कटिबध्द आहोत व बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रयत्नरत राहू. संचालक किशोर मुनोत म्हणाले, आदरणीय पिताश्री यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीचा गत ५० वर्षांचा मी साक्षीदार आहे. यंदा प्रथमच संचालक मंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.