आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; विनायकनगर येथे घडली होती घटना, शवविच्छेदन अहवालातुन खुन केल्याची उघड

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायकनगरच्या समता कॉलनीत घरामध्ये संशयितरित्या मृतअवस्थेत आढळून आलेल्या विवाहितेच्या मृत्यूचे कारण समोर आले. गळा दाबून व विषारी औषध पाजून विवाहितेचा जीव घेतला, असा शवविच्छेदन अहवाल जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले.

सरोज रवी उपाध्ये (वय ३० रा. विनायकनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा भाऊ अशोककुमार नंदकिशोर तिवारी (वय ३७ रा. दिल्ली, मूळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली. आरोपीमध्ये सरोजचा पती रवी मुरलीधर उपाध्ये, सासरे मुरलीधर हुकुमचंद उपाध्ये, सासू परमा मुरलीधर उपाध्ये व नणंद पूजा सुनील जोशी (सर्व रा. विनायकनगर) यांचा समावेश आहे. पती रवी उपाध्ये याला अटक करण्यात आली. आरोपींनी सरोजचा गळा दाबून व विषारी औषध पाजून जीव घेतल्याचे समोर आल्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले. या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत. सरोजचा विवाह सन २०१२ मध्ये रवी उपाध्ये याच्यासोबत झाला होता. सासरच्या लोकांनी सरोजला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली होती. माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आणावे म्हणून शिवीगाळ, मारहाण केली. २८ मार्च रोजी सरोज मृतअवस्थेत आढळून आली होती. यानंतर तिच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुरुवातीला पती, सासू-सासरे व नणंद यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...