आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी:राहात्यात कोयत्याचे वार करून तरुणाचा खून

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील भांडणाच्या कारणावरून राहाता शहरातील योगेश किसन वाघमारे या २३ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर योगेश यास रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या छातीवर तसेच इतर ठिकाणी शस्त्राने गंभीर घाव करून त्याचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ७ आरोपींना अटक केली असून या घटनेतील मुख्य आरोपी रवींद्र कटारनवरे यास जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत नातेवाइकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकूण १८ आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...