आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई:वृध्द दाम्पत्याचा खून करुन चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक, गुन्हा दाखल

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथेल वृध्द दाम्पत्याचा खून करुन चोरी करणारे तीन सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

30 मे ते 1 जून दरम्यान अज्ञात आरोपींनी रात्रीच्या वेळी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय- 65) व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय-75) या दोघांचा खून करुन 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत जालिंदर दत्तात्रय भुजाडे वय 40 यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कारवाईचे आदेश दिले होते. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदारांची तीन विशेष पथके तपासासाठी नियुक्त केली होती. सदर गुन्हा हा अजय काळे याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळताच पोलिस पथक तात्काळ पढेगांव येथे जाऊन आरोपी अजय काळे याला पळून जाताना पाठलाग करुन ताब्यात घेतले.

आरोपींवर गुन्हा दाखल

सदर गुन्हा अमित कागद चव्हाण (वय - 20), जंतेश छंदु काळे (वय-22) यांनी मिळून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानुसार आरोपी अमित चव्हाण व जंतेश काळे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनी सोमनाथ दिवटे, सोपान गोरे, बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, शंकर चौधरी आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...