आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:खर्डा येथे युवकाचा खून; तपास करताना पोलिस चक्रावून गेले

जामखेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल युवक विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२) याचा अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी, १३ मे रोजी रात्री साडेआकराच्या सुमारास डोक्यात शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलिसात त्याचा भाऊ सुशेन ईश्वर सुर्वे यांनी फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

फिर्यादी सुशेन ईश्वर सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल सुर्वे हा शुक्रवारी खर्डा येथील एका व्यापाऱ्याचा माल आणण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे गेला होता. रात्री अकरा वाजता खर्डा येथील व्यापाऱ्यांकडे माल उतरवला व घरी जात आसताना रात्री साडेअकराच्या सुमारास सुर्वे वस्ती रोडवरील लक्ष्मीआई मंदिराच्या मागे कच्च्या रस्त्यावर अज्ञात इसमांनी डोक्यास डाव्या बाजूला जबर मारहाण करून ठार मारले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे अन्वेषण विभाग, श्वान पथक, ठसेतज्ञ पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.

शनिवारी दुपारी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत. खर्डा हे संवेदनशील गाव आहे. त्यामुळे आमदार रोहित पवारांनी प्रयत्न करून येथे पोलिस स्टेशनला मंजुरी आणली होती. कामही पूर्ण झाले. काही दिवसातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अशातच आरोपींनी खून करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना अजून धागेदोरे सापडत नाही.

बातम्या आणखी आहेत...