आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार:मुर्शतपुरला 40 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास, तहसीलदार विजय बाेरुडे यांच्या मध्यस्तीला यश

कोपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यामध्ये शिवार वाहतूक रस्ता, शिवरस्ता व शेतात जाणारे रस्ते अडवणे त्यावर अतिक्रमण करणे, हे प्रमाण जास्त होते. मात्र तहसीलदार विजय बोरुडे यांनी अनेक रस्ता केसेस निकाली काढत शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला. मुर्शतपुर येथील ४० वर्षापासून रखडलेल्या रस्त्यानेही त्यांच्या पुढाकाराने मोकळा श्वास घेतला. कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून बोरुडे यांचा मुर्शतपुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सन्मान करत त्यांचे अभिनंदन केले.

कोळपेवाडी रोड लगत म्हसोबानगर ते टाकळी ब्रँच शाळा हा तीन किलोमीटर रस्ता गेल्या ४० वर्षापासून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करत रुंदी कमी केली होती. त्यामुळे या रस्त्याने शेतकऱ्यांना जाणे मुश्किल झाले होते. शेतात केलेली पिके घरापर्यंत कशी आणायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता चाळीस वर्षापासून खितपत पडलेला प्रश्न ग्रामस्थांनी एकत्र येत सोडवण्याचा निर्णय घेतला. आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या कित्येक वर्षाचा शेतकऱ्यांचा असलेला प्रश्न सोडवण्यासाठी भूमी अभिलेख व महसूल विभागाला सूचना दिल्या. हा रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या मार्फत जेसीपी मशीन व इतर साहित्यही उपलब्ध करून दिले. सरपंच साधना दवंगे, उपसरपंच सुरेखा मोरे, डॉ. अनिल दवंगे, काळे कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे, विष्णू शिंदे, नितीन शिंदे, अजित जावळे, अण्णासाहेब शिंदे,उमेश दीक्षित, रंणजीत घागरे, विक्रम मांढरे, सुनील गिरमे, रोहिदास मोरे, प्रकाश आगवन, गौरव गुरसळ, सिताराम शिंदे, आदींना एकत्र करत विजय बोरुडे यांनी या रस्त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या शेतकऱ्यांची दोन वेळेस बैठक घेतली.

अखेर अतिक्रमण काढलेच या रस्त्यासंदर्भात शेतकऱ्यांना विश्वासात घेत त्याचे महत्त्व पटवून दिले. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत या रस्त्याची मोजणी करण्यात आली. मोजणी प्रक्रिया संजय भास्कर, हराळ व औचारे या अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. मग हा रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदार यांनी आदेश केला. सर्कल व इतर अधिकाऱ्यांमार्फत हा रस्ता अतिक्रमण काढत मोकळा करण्यात आला. तहसीलदार विजय बोरुडे यांच्यामुळे हा रस्ता काटेरी बाभळी व अतिक्रमणे यातून बाहेर येत मोकळा श्वास घेतला.

बातम्या आणखी आहेत...