आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्याचे राजकारण:साईबाबा मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद न करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

शिर्डी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात भोंग्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच रात्रीची शेजारती, पहाटेची काकड आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेल्या साईबाबा समाधी मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू नका, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली. शिर्डीतील सर्व मशिदीत नमाज झाली, परंतु अजानसाठी भोंग्याचा वापर केला नाही. साईबाबा समाधी मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावेत अशी मागणी शिर्डी येथील जामा मशीद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...