आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सज्ञान असतानाही अज्ञान असल्याचे भासवून मिळकतीची परस्पर विक्री

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सज्ञान असतानाही अज्ञान असल्याचे भासवून वडिलोपार्जित मिळकतीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा रमेश दळवी, अरूण दत्तात्रय दळवी व माधुरी राहुल ससाणे (रा. माणिकचौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महेश सुरेश दळवी (वय १८ रा. माणिकचौक) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीची आजी मयत झाल्यानंतर तीचे नावे असलेल्या मिळकतीवर वारसा हक्काने फेरफार नोंद घेण्यात आली होती. सन २०२० साली फिर्यादी महेश यांचे वडील सुरेश दत्तात्रय दळवी हे मयत झाले. सन २०२१ मध्ये फिर्यादीची चुलती सुरेखा दळवी हिने फिर्यादी व त्यांचा लहान भाऊ यांच्यावतीने अज्ञान पालककर्ती म्हणून स्वतःच्या नावाची नोंद केली होती. या मिळकतीचे २८ सप्टेंबर २०२० रोजी माधुरी राहुल ससाणे यांना साठे खरेदी खत लिहून दिले होते.

खरेदी खत लिहून देण्यासाठी माझे चुलते अरूण दळवी व चुलती सुरेखा रमेश दळवी यांनी मी सज्ञान झालेलो असताना देखील त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून मी व माझा भाउ दिनेश दळवी अज्ञान असल्याचे सांगून सदरचे खरेदी दस्त करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली. सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त करून माधुरी राहुल ससाने हिला १५ लाख रूपयामध्ये खरेदी दिली आहे. सदर खरेदी दस्तावर फिर्यादी सज्ञान असतांना देखील त्यांना न सांगता दिल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...