आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:60 लाख रूपये किंमतीच्या जागेची परस्पर विक्री ; कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

६० लाख रूपये किंमतीच्या जागेची परस्पर विक्री केल्याप्रकरणी हबीब ईस्माईल राजकोटवाला (रा. ग्रेस टेरेस सोसायटी, कॅम्प, पुणे) याच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पुतणी आफ्रीन अन्वर राजकोटवाला (रा. मोतीवालानगर, औरंगाबाद) यांनी फिर्यादी दिली आहे.आफ्रीन यांची आमची केडगाव शिवारात वडीलोपार्जित मिळकत आहे. वडील अन्वर इस्माईल राजकोटवाला हे सन २००९ मध्ये व आई आयिशा सन २०११ मध्ये मयत झाली. वडिल हयातीत असतांना सन २००८ मध्ये वाटणीपत्र दस्तप्रमाणे माझ्या वडिलांना वडीलोपार्जित प्रोपर्टी आली होती.

आम्ही आफ्रीन, अमिराबानो, आक्सा व आफशा अशा चार बहिणी असतांनाही चुलता हबीब राजकोटवाला याने ३ ऑक्टोबर २०११ रोजी माझे नाव नमूद करून त्यांच्या हस्ताक्षरात अर्ज लिहून व माझी बनावट सही करून हा अर्ज हा केडगाव तलाठी यांना दिला. तेथे सातबारा सदरी फक्त माझ्या व आफशाच्या नावाची नोंद केली.

अमिराबानो व अक्साची नोंद केली नाही. त्यानंतर मला व आफशा हिला हबीब राजकोटवाला यांनी दुय्यम निबंधक कार्यालय नगर येथे १७ जून, २०११ रोजी नेले व वडीलोपार्जित मिळकत आमच्या नावे करून देतो म्हणून माझ्या व आफशाकडुन मुख्त्यारपत्र करून घेतले. त्यानंतर तब्बल १० वर्षाने त्या मुख्त्यार पत्राच्या आधारे आमची केडगाव येथील वडीलोपार्जित मिळकत ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी खरेदीखत करून साद इलीयास मेमन यांना ६० लाख रूपये किंमतीला विक्री करून हबीब राजकोटवाला याने आमची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशाने याआधीही पोलिसात गुन्हा
हबीब राजकोटवाला, रेहान राजकोटवाला व सायरा राजकोटवाला यांनी फिर्यादीच्या वडीलांची टीन गल्ली गंजबाजार येथील मिळकत चुकीच्या बक्षीसपत्राद्वारे व सावेडी येथील जमीन ही चार बहिणी असतानाही दोनच बहिणी अन्वर राजकोटवाल यांना वारस आहेत, असे हमीपत्र लिहून घेतले. फिर्यादीच्या वडिलांची मालमत्ता फिर्यादी व बहिणीच्या नावे करून देण्याचा बहाणा करून त्याची विक्री केल्याबाबत न्यायालयाचे आदेशाने त्यांच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...