आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:नगरने ॲक्टिव्ह रुग्णांत मुंबईलाही मागे टाकले, मुंबई 5 हजार 269, तर नगरमध्ये 5 हजार 782

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्याच्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्येने मुंबईलाही शनिवारी मागे टाकले. मुंबईची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५,२६९ होती, तर नगरमध्ये ५,७८२ ॲक्टिव्ह रुग्ण होते. शनिवारी जिल्ह्यात १,०५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक व रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या प्रेस नोटमध्ये शनिवारी मुंबईत नगरपेक्षा कमी रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०१ आणि अँटिजन चाचणीत ४४२ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये बाधित रुग्णांमध्ये मनपा १०, अकोले ४, जामखेड १, नगर तालुका १३, नेवासा १, पारनेर ३६, पाथर्डी ४, राहुरी १, संगमनेर १६, शेवगाव १, श्रीगोंदे १३, कॅंटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...