आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:घरासमोर दारू पिऊ नका म्हटल्याने‎ तिघांना मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर दारू पिऊ नका, असे‎ म्हटल्याच्या रागातून चौघांनी एका‎ युवकासह त्याच्या आई व‎ चुलतीला मारहाण केल्याची घटना‎ शनिवारी रात्री उशिरा घडली.

या‎ प्रकरणी तरुण खेमचंद बजाज‎ (वय ३१, रा. कवर नगर, सिंधी‎ कॉलनी, तारकपूर) यांनी दिलेल्या‎ फिर्यादीवरून तोफखाना पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे.‎ अभिषेक वाही (कंत्रोडगल्ली,‎ गुरुद्वाराशेजारी, तारकपूर), कमल‎ पंजवाणी (रा. गोविंदपुरा), नरेश‎ भेरुमल मोटवाणी (रा. कवर‎ नगर, सिंधी काॅलनी), सुमीता‎ अभिषेक वाही (रा. तारकपूर)‎ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.

अभिषेक,‎ कमल व नरेश हे तरुण बजाज‎ यांच्या घरासमोर दारू पित उभे‎ होते. बजाज यांनी त्यांना इथे‎ रोडवर दारु पिऊ नका, येथे‎ महीला फिरत असतात, असे‎ सांगितले. त्याचा राग आल्याने‎ त्यांनी बजाज यांना शिवीगाळ‎ करत मारहाण केली. त्यावेळी‎ अभिषेक वाही याने आमचे गेट‎ च्या आतमध्ये असलेला‎ प्लस्टिकचा पाइप उचलून हातात‎ घेऊन माझ्या उजव्या बरगडीवर व‎ खांदयावर मारला.

त्यावेळी‎ बजाज यांची आई व चुलती‎ भांडण सोडविण्यासाठी आल्या‎ असता त्यांनाही मारहाण केली.‎ त्यानंतर अभिषेकची पत्नी सुमीता‎ वाही हिने बजाज यांच्या घराच्या‎ दरवाजावर व खिडकीवर दगड‎ फेकले व जिवे मारण्याची धमकी‎ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.‎ अधिक तपास पोलिस करत‎ आहेत.‎