आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरात बुलेटची चोरी करून त्याचे पार्ट सुटे करून विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. त्यातील चोरांना दोन दिवस, तर विल्हेवाट लावणाऱ्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
२० फेब्रुवारी रोजी मनीष मदनलाल फुलढाळे यांची बुलेट ख्रिस्त गल्ली येथून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना चोरीस गेलेली बुलेट अहमद मुन्ना शेख (रा. मुकुंदनगर) याने चोरी केली व ती साथीदार शाहरुख आलम शेख (रा. नागरदेवळे) याच्या घरात लपवून ठेवल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.
बुलेटची विल्हेवाट
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सदर बुलेट आम्ही चोरुन नंतर तीचे सर्व स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन ते भंगार दुकानदार जावेद रऊफ शेख (रा. सादिकमळा, भिंगार) व राम विलास ससाणे (रा. गजराजनगर) यांना विक्री केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांना अटक करुन चोरीस गेलेल्या बुलेटचे स्पेअर पार्टस्, इंजिन, चेसीज हस्तगत केली. अधिक तपास पोना बाळासाहेब मासळकर हे करीत आहेत. कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना ए. पी. इनामदार आदींनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.