आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:एक किलो वांगी द्या म्हणत दुचाकीवरील दोघांनी‎ महिलेचे गंठण पळवले‎

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ हेल्मेट घातलेल्या दुचाकीवरील‎ दोघांनी भाजी विक्रेत्या महिलेचे‎ गंठण ओरबाडून पळवल्याची घटना‎ शुक्रवारी (१२ मे) सकाळी गोकुळ‎ नगर परिसरात घडली. चंद्रकला‎ नारायण कजबे (वय ५५, रा. कजबे‎ वस्ती, पंचरत्न नगर, पवननगर‎ कमानी समोर, भिस्तबाग) यांनी‎ दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

नक्की घडले काय?

फिर्यादी कजबे या त्यांच्या‎ शेतातील भाजीपाला हातविक्री‎ करुन कुटुंबाचा उरनिर्वाह‎ चालवतात. शुक्रवारी सकाळी ८‎ वाजता त्या घरातून भाजीपाला‎ विक्री करण्यासाठी निघाल्या व‎ गोकुळनगर येथील महाराजा‎ गणपती मंदिरासमोर बसून‎ भाजीपाला विक्री करत होत्या.‎ यावेळी डोक्यावर हेल्मेट घातलेले‎ दोघांनी दुचाकीवरून त्यांच्याजवळ‎ आले.

एकाने गाडीवरून उतरून‎ वांगी ताजी आहेत का? १ किलो‎ वांगी द्या, असे म्हणाला. कजबे या‎ वजनकाटा घेऊन त्या वांगी मोजत‎ असताना त्या चोरान कजबे यांच्या‎ गळ्यातील सोन्याचे २ तोळ्यांचे‎ गंठण बळजबरीने ओढले व‎ दुचाकीवरून भरधाव वेगात‎ भिस्तबाग महालाच्या दिशेने पळून‎ गेला. त्यानंतर त्यांनी तोफखाना‎ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.‎ अधिक तपास पोलिस करत आहेत.‎