आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरातील वाकी जलाशयाजवळ निवासस्थान असलेल्या मधुकर किसन सगभोर यांच्या वस्तीवर आलेल्या अज्ञात ३ दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ३८ वर्षीय घरमालकाचा खून झाला, मारहाणीत पत्नी पुष्पा मधुकर सदगीर (३२) जखमी झाली. ही घटना मंगळवारी (९ मे) पहाटे उघडकीस आली.
तालुक्यातील मधुकर सगभोर (वय ३८) यांची वाकी जलाशयाजवळ वस्ती आहे. सोमवारी (८ मे) रात्री दीडच्या सुमारास अज्ञात ३ दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने मधुकर सगभोर यांच्या वस्तीत रात्रीच्या सुमारास प्रवेश करून धुमाकूळ घातला. या दरोडेखोरांनी घरातील लोकांना मारहाण करून किमतींऐवज व रोख पैशाची मागणी केली. यावेळी घरातील बेन्टेक्सच्या दागिन्यांसह उपलब्ध रक्कम दरोडेखोरांनी हस्तगत केली. यात मधुकर सगभोर यांना मारहाण केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मारहाण करून केले जखमी
घरात झोपलेल्या मधुकर यांच्या पत्नी पुष्पा व मुलगी पायल व इतरांना दरोडेखोरांनी लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. या घटनेची माहिती वाकीचे पोलिस पाटील सोमनाथ सगभोर यांनी राजूर पोलिसांना कळवली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जे. एफ. शेख व पोलिस कर्मचारी दिलीप डगळे, विजय मुंडे, विजय फटांगरे, अशोक काळे, संभाजी सांगळे, साईनाथ वर्षे, पांडुरंग पटेकर, उषा मुठे हे करीत आहेत.
मृत मधुकर यांची मुलगी पायल सगभोर हिच्या फिर्यादीवरून तीन दरोडेखोरांविरुद्ध खून तसेच घरफोडीचा गुन्हा दाखल केला. श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेर येथील पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, तपासकामी त्यांनी सपोनि गणेश इंगळे यांना सूचना दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.