आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरकुल योजनेला गती देण्यासाठी अमृत महा आवास अभियान २० लहैंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत हाती घेण्यात आले. या शंभर दिवसांत अहमदनगर जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत १० हजार १९९ घरकुलांची उभारणी केली. तर राज्यस्तरावरील योजनेत ३ हजार १४२ घरकुलांची उभारणी करत दुसरे स्थान पटकावले. राज्यस्तर योजनेत ३३३२ घरकुलांच्या उभारणीसह जालना नंबर एकवर आहे. अहमदनगर प्रथम क्रमांकावर आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिव्य मराठीला दिली. देशभरात २०१६-२०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना हाती घेण्यात आली होती. या योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी १ लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते.
त्यात केंद्राचा हिस्सा ६० टक्के तर राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. शौचालय नसल्यास अतिरिक्त १२ हजार व स्वत: मजूर म्हणून नरेगांतर्गत काम केल्यास त्याचे अतिरिक्त २३ हजार रोजंदारीचे लाभार्थ्याला अदा केले जातात. तर राज्य सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या रमाई आवास, शबरी तसेच पारधी घरकुल योजनेंतर्गत १०० टक्के अनुदान अदा केले जाते. घरकुलपात्र लाभार्थ्यांना १५ हजार आगाऊ रक्कम दिली जाते. बांधकामाची प्लिंथ लेवल झाल्यावर ४५ हजार, सात फुटापर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ४० हजार तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २० हजार रक्कम दिली जाते. जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेने अमृत महा आवास अभियानात घरकूल उभारणीला गती दिली. अहमदनगर खालोखाल यवतमाळ ६ हजार ६७२ घरकुलांसह दुसऱ्या तर गोंदिया ६११४ घरकुल उभारणीसह तिसऱ्या स्थानी आहे.
उद्दिष्टपूर्तीत नगर तिसऱ्या स्थानी
घरकुल योजना सुरू झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी ६० हजार ७६७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत नगरने ४८ हजार २७९ घरकुले उभारून राज्यात तिसरे स्थान पटकावले. राज्याच्या योजनेसह उभारणीचा आकडा ७५ हजार ७८८ आहे. गोंदीया जिल्ह्याला ९६११३ चे उद्दिष्ट असताना, सर्वाधिक ८४२२३ घरकुल उभारून उद्दिष्टपूर्तीत पहिल्या स्थानावर आहे. ७२४६० घरे उभारून नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.