आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चेबांधणी:भाजप जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुक करणार आज शक्तीप्रदर्शन‎, शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी‎ रस्सीखेच‎

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ तीन वर्षांची मुदत संपल्याने नगर शहर,‎ दक्षिण व उत्तर जिल्हा भाजपचे‎ जिल्हाध्यक्ष बदलणार असल्याने या‎ पदासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार‎ मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपचे‎ प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी गुरुवारी (ता.‎ ११) नगर शहरात येत असून, जिल्हाध्यक्ष‎ पदांच्या निवडीबाबत कार्यकर्ते व‎ पदाधिकाऱ्यांची मते ते जाणून घेणार‎ आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदांसाठी‎ इच्छुकांकडून पक्ष कार्यालय परिसरात‎ मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे ‎समजते.‎

जिल्हाध्यक्ष पदाची चर्चा

या प्रदेश कार्यकारिणीत नगर‎ जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांचा‎ समावेश केला असून, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना प्रदेश ‎चिटणीसपद देण्यात आले आहे. प्रदेश कार्यकारिणीत सदस्य म्हणून ज्येष्ठ नेते‎ अभय आगरकर, जिल्हा परिषदेचे‎ भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे व‎ माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांची वर्णी‎ लागली आहे. प्रदेश कार्यकारिणी जाहीर‎ झाल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पदांच्या‎ निवडी होणार असून, सर्वाधिक चर्चा‎ नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरू‎ झाली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये‎ जिल्हाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची‎ असल्याने शहराध्यक्ष पदासाठी नगर‎ शहरातून विद्यमान शहराध्यक्ष भैया गंधे‎ यांच्यासह माजी महापौर बाबासाहेब‎ वाकळे, सचिन पारखी, वसंत लोढा‎ इच्छुक आहेत. दक्षिण व उत्तरेतदेखील‎ बदल होणार असून, उत्तरेतील‎ जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी महसूलमंत्री‎ राधाकृष्ण विखे यांची भूमिका महत्त्वाची‎ मानली जाणार आहे.

सकाळी होणार बैठक

दक्षिणेत जिल्हाध्यक्ष‎ बदलासाठी आमदार राम शिंदे, मोनिका‎ राजळे व बबनराव पाचपुते यांची भूमिका‎ महत्त्वाची राहणार आहे. गुरुवारी‎ जिल्हाध्यक्ष पदाच्या पहिल्या टप्प्यातील‎ निवड प्रक्रियेसाठी प्रवक्ते माधव भंडारी‎ नगरमध्ये येणार आहेत. सकाळी ११‎ वाजता गांधी मैदान येथील पक्ष‎ ‎कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत बैठक‎ होणार आहेत.

या बैठकीत ते जिल्हाध्यक्ष‎ पदासाठी इच्छुक असलेल्या‎ पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक बोलणार‎ असून, त्याचबरोबर कार्यकर्ते व अन्य‎ पदाधिकाऱ्यांशी देखील याबाबत मते‎ जाणून घेणार आहे.‎ जिल्हाध्यक्ष निवडीच्या पहिल्या‎ टप्प्यातील प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर‎ भाजपमधील जिल्हाध्यक्ष पदांचे इच्छुक‎ जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत‎ असून, कार्यकर्त्यांची मते,‎ पदाधिकाऱ्यांशी चर्चा व इच्छुकांची चर्चा,‎ याचा सर्व अहवाल भंडारी हे प्रदेशाध्यक्ष‎ चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठ‌णार‎ असल्याचे सांगण्यात आले.‎

उत्तरेतून 'मराठा' चेहरा

नगर शहर व उत्तरेतून मराठा चेहरा समोर येऊ शकतो ‎ दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे हे प्रदेश चिटणीस झाल्याने दक्षिणेतून जिल्हाध्यक्ष ‎ पदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंढे स्वतः या पदासाठी इच्छुक ‎ असले, तरी नवा चेहरा दक्षिणेतून भाजप समोर आणणार आहे.

प्रामुख्याने दक्षिणेत ‎ ओबीसी, एनटी समाजातून जिल्हाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. नगर शहर व ‎ उत्तरेतून मराठा चेहरा जिल्हाध्यक्ष पदासाठी समोर येऊ शकतो, असा जाणकारांचा ‎ अंदाज आहे. ‎

जिल्हाध्यक्ष पदाची‎ माळ

सक्षम यंत्रणा असणाऱ्यांना मिळणार पदाची संधी‎ यापूर्वी देण्यात आलेल्या शहराध्यक्ष पदांचा विचार करता, शहर जिल्हाध्यक्ष पदाची‎ माळ सक्षम यंत्रणा असलेल्या इच्छुकाच्या गळ्यात पडण्याची चिन्हे असून,‎ त्यासाठी इच्छुकांनी पक्षासाठी केलेले काम, त्यांचा जनसंपर्क व सोशल मीडिया‎ अॅक्टिव्हिटीज हे प्राधान्याने पाहिले जाणार आहे. प्रामुख्याने सरल ॲप व अन्य‎ उपक्रमाद्वारे किती लोकांना जोडले, हे देखील पाहिले जाणार आहे.‎