आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागावठी कट्ट्यातून झालेल्या गाेळीबाराने नगर जिल्हा पुन्हा हादरला अाहे. राष्ट्रीय िकक बाॅक्सिंग खेळाडू व नेवासे तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतचे सदस्य संकेत चव्हाण यांच्यावर हल्लेखाेरांनी गावठी कट्ट्यातून अंधाधुंद गाेळीबार केला. गाेळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. बऱ्हाणपूर-चांदा रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. या गाेळीबारामुळे नगर शहर व जिल्ह्यात राजराेसपणे सुरू असलेल्या गावठी कट्ट्यांचा खरेदी -विक्रीचा गंभीर मुद्दा पुन्हा एेरणीवर अाला.
संकेत चव्हाण हे मंगळवारी रात्री घोडेगाव येथून काम आटोपून आपल्या खासगी वाहनातून बऱ्हाणपूरकडे जात हाेते. बऱ्हाणपूर-चांदा रस्त्यावर घरापासून पाचशे फुटांवर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून ते लघुशंका करण्यासाठी थांबले हाेते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दाेन अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून संकेत यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज एेकून संकेतचे वडील व चुलत बंधू रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. संकेतला त्यांच्याच वाहनातून प्रथम जिल्हा रुग्णालयात व नंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शनीशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी मोठ्या पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरून पोलिसांनी रिकामे काडतुसे हस्तगत करण्यात अाली अाहेत.
गावठी कट्ट्यांवाल्यांचे रॅकेट सक्रीय
मध्यप्रदेश राज्यातील उंबरठी, लालबाग कामठी, बडवाणी, सैंधवा येथून गावठी कट्टे आणून ते ५ ते २५ हजार रुपयांमध्ये गल्लीगल्लीत भाईगिरी करणाऱ्यांना विकणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय आहे. त्यामुळेच किरकोळ वादातून गोळीबाराच्या अनेक घटना जिल्ह्यात घडतात. केडगाव दुहेरी हत्याकांड, जामखेड हत्याकांडाची ही त्याची माेठी उदाहरणे आहेत. तत्कालिन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गावठी कट्ट्याची विक्री करणारे व ते बाळगणाऱ्याच्या विरोधात कारवाईची ठोस भूमिका घेतली होती. त्यामुळे गावठी कट्ट्याची खरेदी विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील रॅकेटला लगाम बसला होता. मात्र, सध्या वारंवार हाेणाऱ्या गाेळीबाराच्या घटना पाहता हे नगर जिल्ह्यात रॅकेट पुन्हा सक्रीय झाले असल्याचे स्पष्ट हाेते.
पाेलिसांची भूमिका संशयास्पद
संकेत यांच्यावर गावठी कट्ट्यातून अंधाधुंद गाेळीबार करणाऱ्या या अाराेपींना पकडण्याचे माेठे अाव्हान पाेलिसांसमाेर अाहे. दोन दिवसांपूर्वीच सोनईत धुमाकूळ घालणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी मोठ्या शिताफीने पकडले हाेते. परंतु या चोरट्यांना अाश्रय देणारा व पांढरी पुल परिसरात गाड्यांचे डिझेल चोरणाऱ्याला साेनई पाेलिसांनी मुद्देमाल सापडून देखील अभय दिले. पाेलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप अाहे.
नगर जिल्ह्यामध्ये खून, दराेडे अाणि अपहरण...
नगर शहरासह जिल्ह्यात खून, दराेडा, अपहरण अाणि हाणामारीच्या गुन्ह्यांमध्ये माेठी वाढ झाली. श्रीरामपूर येथील व्यवसायिक हरण यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी अाहे. काही दिवसांपूवी शहरातील उद्याेजक हुंडेकरी यांचेही अपहरण झाले हाेते. चांदा येथे चार दिवसांपूवीच अवैध धंद्यांच्या कारणातून एकाचा खून झाला. हाणामारीतून एकाचा खून झाल्याचा गुन्हा देखील नुकताच शहरातील ताेफखाना पाेलिस ठाण्यात दाखल अाहूे. यावरूनच खून, दराेडा, अपहरण, हाणामारीच्या गुन्ह्यात माेठी वाढ झाल्याचे स्पष्ट हाेते. बऱ्हाणपूर (ता. नेवासे ) येथे संकेत चव्हाण यांचेवर गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी करतांना अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे. समवेत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, सपोनि सचिन बागुल आदी.
खून, दराेडा, हाणामारी, अपहरणाच्या गुन्ह्यात माेठी वाढ
केले. दरम्यान घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शनीशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी मोठ्या पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरून पोलिसांनी रिकामे काडतुसे हस्तगत करण्यात अाली अाहेत.
अाराेपींना अटक न झाल्यास रास्ता राेकाे
गाेळीबार करणाऱ्या दाेन्ही हल्लेखाेरांना संकेत यांनी अाेळखले अाहे. तशी माहिती त्यांनी दवाखान्यात घेऊन जाणारे बंधू रवींद्र चव्हाण यांना दिली. हल्लेखोर हे गावातीलच असून गुन्हेगारी प्रवत्तीचे अाहेत. गाेळीबार करून ते फरार झाले असून पाेलिस त्यांचा शाेध घेत अाहेत. हे दोघे हल्लेखाेर दुचाकीसह कांगोणी फाट्यावर अनेकांना दिसले असल्याची प्राथमिक माहिती पाेलिस तपासात पुढे अाली. आरोपींना लवकर अटक न झाल्यास नगर- औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा बऱ्हाणपूर ग्रामस्थ व क्रीडा संघटनांनी दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.