आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमी:‘ज्याचा त्याचा प्रश्न’राज्य नाट्य स्पर्धेत नगर प्रथम

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन, विजेत्या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड, इतर पारितोषिकेही जाहीर

नुकत्याच पार पडलेल्या साठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून वात्सल्य प्रतिष्ठान (अहमदनगर) या संस्थेच्या ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे अहमदनगर केंद्रातून ‘महापात्रा’ (रंगकर्मी प्रतिष्ठान, अहमदनगर) नाटकाला द्वितीय, तर ‘षडयंत्र’ (संकल्पना फाउंडेशन, कोपरगाव) तृतीय पारितोषिक जाहीर झाले.

प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषिक गणेश लिमकर (महापात्रा, द्वितीय - मुन्ना सय्यद (ज्याचा त्याचा प्रश्न) यांना जाहीर झाले. उत्कृष्ट नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक दीपक ओहोळ (नागपदम्) यांना, तर द्वितीय - नाना मोरे (महापात्रा) यांना जाहीर झाले. उत्कृष्ट रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक युक्ता ठुबे (तुक्याची आवली) यांना, तर द्वितीय - प्रांजल सपकाळ (षडयंत्र) यांना जाहीर झाले आहे.

श्रुती देशमुख (महापात्रा), रेवती शिंदे (ज्याचा त्याचा प्रश्न), श्रद्धा तिरमरवे (षडयंत्र), आरती अकोलकर (नागपद्म), मयूर तिरमखे (षडयंत्र), तेजस अतितकर (ज्याचा त्याचा प्रश्न), देवीप्रसाद सोहनी (महापात्रा), अथर्व धर्माधिकारी (कोणी तरी येणार गं) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे जाहीर झाले आहेत.

२१ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२ या कालावधीत माऊली सांस्कृतिक सभागृह, अहमदनगर येथे अतिशय जल्लोषात ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत एकूण ११ नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरेश बारसे, अरुण शेलार व अनिल पालकर यांनी काम पाहिले.

सतीश लोटके उत्कृष्ट दिग्दर्शक
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक सतीश लोटके (ज्याचा त्याचा प्रश्न), द्वितीय - शैलेश देशमुख (महापात्रा) यांना जाहीर झाले. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक दीपक शर्मा (ज्याचा त्याचा प्रश्न) यांना, तर अश्विनी अंचवले (तुक्याची आवली) यांना जाहीर झाले.

बातम्या आणखी आहेत...