आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २५ मार्चला ९ हजार ३७२ मजूरांना रोजगार मिळाला होता. परंतु, विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) ११ एप्रिलपासून कामावर बहिष्कार घातल्याने ८ मेपर्यंत मजूरसंख्या अवघी १ हजार ९८९ वर घसरली होती.
मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने, बिडीओंनी आंदोलन मागे घेऊन कामाला सुरूवात केली.
रोजगार विभागाकडे नोँद
दोन दिवसांत मजूर संख्येत अडीच हजारांनी वाढ होऊन ४७५४ वर पोहोचली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रोजगार हमी कामावर मजुरांची संख्या वाढते, परंतु यंदा वाढलेली मजूर संख्या कमी झाल्याचे दिसून आले. २५ मार्चला जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तर व यंत्रणा स्तरावर सुमारे २ हजार २७ कामे सुरू होती. या कामांवर तब्बल ९ हजार ३७२ मजूर असल्याची नोंद रोजगारहमी विभागाकडे झाली.
त्यानंतर १ एप्रिल १ हजार ४९६ कामावर ६६७२ मजुर होते. पुढे विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी मनरेगाच्या कामावर ११ एप्रिलपासून बहिष्कार घातल्याने टप्प्याटप्प्याने मजुरांची संख्या कमी होत गेली. २८ एप्रिलला ११३९ कामांवर ५५५१ मजूर उपस्थित होते. या आंदोलनामुळे ८ मे रोजी जिल्ह्यात अवघी १३२ कामे सुरू होती, त्यावर केवळ १ हजार ९८९ मजूर कामावर होते. याची दखल शासनाने घेतली.
कामावर किती मजूर?
याबाबत ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारे, अपर सचिव रोहयो नंदकुमार, मनरेगाचे आयुक्त शंतनू गोयल यांच्या उपस्थित महाराष्ट्र विकास सेवा रापत्रित अधिकारी संघटनेची सोमवारी (८ मे) बैठक झाली. चर्चा सकारात्मक झाल्याने आंदोलन मागे घेऊन अधिकाऱ्यांनी पूर्ववत कामे सुरू केली. गुरूवारी सुरू असलेल्या कामांचा दैनिक दिव्य मराठीने आढावा घेतला असता ९६९ कामांवर ४ हजार ७५४ मजूर उपस्थित झाल्याचे दिसून आले.
काय सांगते आकडेवारी?
तालुकानिहाय कामे व मजूर संख्या अकोले ३४ (११७), जामखेड ११६ (९७७), कर्जत १३३ (७८२), कोपरगाव ५१ (१४७), नगर ११६ (३६७), नेवासे ३७ (१६६), पारनेर ४९ (३१०), पाथर्डी ७ (७०), राहाता १०१ (३८३), राहुरी १०५ (३५२), संगमनेर ५७ (३१७), शेवगाव ६६ (२९४), श्रीगोंदे ४७ (२३७) तर श्रीरामपूर तालुक्यातील ५० कामे (२३९).
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.