आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नगर-शिर्डी रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे, भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांना निवेदन

शिर्डी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर ते शिर्डी रस्त्याची पूर्वीची निविदा ३५० कोटींची असूनही त्यात बऱ्याच ठिकाणी काँक्रीटीकरण होते. परंतु आता ८०० कोटी रुपयापर्यंत अंदाजपत्रक तयार करूनही त्यात काँक्रिटीकरण नसून फक्त डांबरीकरणाचे थर घेतले असून या रस्त्यावर प्रचंड अवजड वाहतूक असल्याने संपूर्ण रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे आग्रह धरावा, अशी मागणीचे निवेदन भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना दिले.

डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी हनुमानाची मूर्ती देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ममता पिपाडा, मदनलाल पिपाडा, महावीर पिपाडा, निखील पिपाडा, श्रुती पिपाडा, गोरख पवार आदी यावेळी उपस्थित होते. नगर ते शिर्डी या महामार्गाबाबत अॅड. राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा झाली. रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत तत्काळ खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधितांना कराव्यात, अशी मागणी केली. निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आम्ही २०१४ पासून नगर-शिर्डी रस्त्याची कामे केंद्र सरकारच्या निधीतून मंजूर करावी, अशी मागणी करीत आहोत. नगर ते शिर्डी हायवेची भीषण अवस्था झालेली असून महामार्गाची पुरती चाळण झाली. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले. सर्वाधिक अवजड वाहनांची वर्दळ असून या महामार्गावर लहान मोठी वहाने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. केवळ खड्ड्यांमळे फार लोकांचे प्राण या रस्त्यावर गेले. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतुक असलेला नगर-मनमाड हा एकमेव महामार्ग आहे. रस्ता जागोजागी फुटलेला आहे. वाहने आदळून किंवा खड्डे चुकविताना अपघात होतात वाहनांचे स्पेअर पार्ट व प्रवाशांचे हाडे खिळखिळी होत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमळे प्रचंड धुळ झाली असून वाहन चालवणे अवघड झाले. ३० वर्षापासून नगर ते शिर्डी या महामार्गाची अवस्था दयनीय झाली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होऊन बळी जात आहेत. वास्तविक हा रस्ता पूर्वीच होणे गरजेचे होते. हा रस्ता यापूर्वी काँक्रिटीकरण करण्याचे ठरवले होते, त्याची निविदा प्रक्रिया (३५० कोटी) झाली होती व कामही दिले होते. परंतु आता ते काम रद्द करून नगर ते शिर्डी या रस्त्याचे ८०० कोटी रुपयापर्यंतचे अंदाजपत्रक तयार करून त्यात काँक्रीटीकरण कमी करून फक्त डांबराचे थर घेतले. हा रस्ता प्रचंड अवजड वाहतुकीचा आहे. आजपर्यंत हजारो प्रवाशांचे बळी या रस्त्याने घेतले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकऱण होऊन मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. याबाबत लक्ष घालून सदर रस्ता संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात आपण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आग्रह धरावा, अशी विनंती अॅड. नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली.

रस्त्याच्या प्रश्नात लक्ष घालू नगर ते शिर्डी या रस्त्याबाबत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा झाली. नगर-शिर्डी रस्त्याचा प्रश्न सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा झाला. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तत्काळ त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना नगर-शिर्डी रस्त्याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र देण्यास सांगितले. या प्रश्नी लक्ष घालू, असे आश्वासन त्यांनी दिले. भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी नगर- शिर्डी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे निवेदन विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांना देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...