आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती खेळाला चालना:नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाला धर्मदायची मान्यता

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली असून, नुकतीच त्याला धर्मदाय उपायुक्तांची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष नाना डोंगरे यांनी दिली. शहरी व ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करून युवकांमध्ये खेळाडूवृत्ती वाढीस लागण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली आहे. कुस्तीबरोबरच इतर मैदानी खेळ देखील खेळविण्यात येणार आहे.