आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाबरोबरच उकाडा प्रचंड वाढला असून, गुरुवारी नगर शहराचे तापमान ४० अशांवर गेले होते. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
दुपारी १२ ते ३ बाहेर जाणे टाळावे असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी केली आहे.
उन्हाचा चटका वाढला
मार्च एप्रिल महिन्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाळा जाणवला नाही. मात्र मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणू लागले आहेत. बुधवारी शहराचे तापमान ३८ अंश होते. गुरुवारी यात एका अंशांने वाढ होऊन तापमान ४० अंश झाले होते. गुरुवारी दिवसभर शहर व परिसरात उन्हाबरोबर उकडाही जाणवत होता. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने गुरुवारी अलर्ट जारी केला आहे.
प्रशासनाने उष्मा लाटेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा, दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
प्रशासनाचे आवाहन
सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे व झडपांचा वापर करावा. हलकी, पातळ व सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.