आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा वाढणार:तापमान 41 अंशावर जाणार?‎, उकाड्याने नगरकर हैराण, बुधवारी 38° सेल्सियसची नोंद

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ दिवसभर ढगाळ वातावरणाबरोबरच‎ वातावरणात वाढलेल्या उकाड्यामुळे बुधवारी‎ (ता. १०) नगरकर हैराण झाले होते. नगर‎ शहराचे तापमान बुधवारी ३८ अंश सेल्सिअस‎ नोंदवण्यात आले होते. गुरुवारी (ता. ११)‎ शहराचे तापमान ४१ अंशावर जाण्याची शक्यता‎ वर्तवण्यात आली आहे.‎

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झाडाखाली विसावा घेताना मजूर महिला.‎
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झाडाखाली विसावा घेताना मजूर महिला.‎

गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात‎ ढगाळ वातावरण असले, तरी पाऊस मात्र‎ कुठेच झालेला नाही. ढगाळ वातावरणाबरोबरच‎ उकाडादेखील वाढल्याने दुपारी शहरातील‎ प्रमुख बाजारपेठेत खूप शुकशुकाट जाणवत‎ होता. बहुतेक ठिकाणी दुपारी उन्हाच्या‎ तडाख्यापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली‎ आश्रय घेताना नागरिक दिसत होते. त्याचबरोबर‎ अनेक ठिकाणी शीतपेय घेण्यासाठी ग्राहकांची‎ गर्दी होती.‎