आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत नगरकरांनी रचला इतिहास

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रीडा आजारावर मात करत कर्णधार शंकर गदाईने मुंबईसारख्या बलाढ्य संघाला टक्कर देत मिळवला विजय

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत नगरच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले आहे. आजारावर मात करत संघाचा कर्णधार शंकर गदाईच्या नेतृत्वाखाली संघाने घवघवी यश मिळवले आहे.

मुंबईतील ठाणे येथे झालेल्या ६९ व्या राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत नगरकरांनी मुंबई सारख्या बलाढ्य संघाला टक्कर देत व संघाचा कर्णधार असलेला शंकर गदाईने आजारावर मात करत आपल्या संघाला विजयाच्या शिखरावर पोहोचविले आहे. कर्णधार शंकर गदईच्या नेतृत्वाखालील संघात सहभागी असलेले राहुल खाटीक, राहुल धनवटे, राम आढागळे, आदित्य शिंदे, देवा जगताप, प्रेम खुरंगे, अजित पवार, अजिंक्य जिवरक, प्रफुल्ल झावरे, संभाजी वाबळे, राहुल आगळे यांनी राज्यस्तरीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत नगरच्या मानाच्या पेचात आणखी एक तुरा रोवला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चाखत अजिंक्यपद पटकावले आहे. चाळीस मिनिटाच्या खेळात बरोबरीने 5-5 चढायामध्ये सामना बरोबरीत आणून सुवर्ण स्पर्धेत कर्णधार शंकरने गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत असलेल्या शंकरने आपल्या आजारावर मात करत हा विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल संघाचे राहता येथील जय मल्हार मित्र मंडळ व जय भगवा मित्र मंडळाचे आदिनाथ वाघ, सुनील राखपसरे, संदीप मुर्तडक, महेश सोनवणे, सागर गांगुर्डे, यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...