आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीची गुढी:नगरकरांनी उभारली ‘सुवर्ण’ खरेदीची गुढी; निर्बंधमुक्तीनंतर शहरात प्रथमच बाजारपेठेत सोने, वाहन, गृहखरेदीतून दोनशे कोटींची उलाढाल

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून लांबणीवर टाकलेल्या सुवर्ण खरेदीला नगरकरांनी अखेर साडे तीन मुहर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहर्त काढत सोन्या, चांदीचे दागिने खरेदी केले. प्रतितोळा ५५ हजार ५०० रुपये सोन्याचा भाव असतानाही अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी केली होती. सोने खरेदीबरोबर वाहने, गृहखरेदीतून दिवसभरात दोनशे कोटींची आर्थिक उलाढाल झाली.यात सर्वाधिक ५० ते ७० कोटींची उलाढाल ही सुवर्ण खरेदीतून झाली. दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त शहरात घरोघरी गुढी उभारुन नगरकरांनी मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच सण-उत्सव निर्बंधांमुळे साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले होते. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला होता. कोरोनामुळे अनेकांनी विवाह, जत्रा, यात्रा, तसेच कौंटूबिक कार्यक्रम पुढे ढकलले होते. दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटविल्यानंतरचा शनिवारी पहिला सण हा गुढीपाडव्याचा होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खरेदीसाठी बाजारात उत्साह दिसून येत होता.

नगर शहरातील सराफ बाजारात सोन्याची दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली असली तरी शहरातील सावेडीसह उपनगरांमध्ये असलेल्या मोठ्या सराफ पेढीत देखील मोठी गर्दी केली होती. नगर शहर व उपनगरांमध्ये २९० छोटी-मोठी सराफांची दुकाने आहेत. तर जिल्ह्यात अडीच हजार सराफ दुकाने आहेत.गुढीपाडव्याच्या मुहर्तावर शंभर किलो सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज असून, त्यातून ६० ते ७० कोटींची उलाढाल झाली आहे.

वाहनबाजारात ७० कोटींची तर गृहखरेदीतून ९० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, इलेक्ट्रीक वस्तुंसह फर्निचर खरेदीतुनही मोठी आर्थिक उलाढाल झाली.

बातम्या आणखी आहेत...