आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील नांदगाव येथील १७ वर्षे भारत मातेची सेवा करून भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेले व सध्या मंत्रालय मुंबई येथे कार्यरत असणारे अविनाश नारायण पुंड यांचे चिरंजीव आदित्य पुंड याने नुकत्याच सीबीएससीने जाहीर केलेल्या शालांत परीक्षेत यश मिळवतांना ऑल इंडिया मधून आठवा रँक मिळवला.
आदित्यने आपल्या यशाच्या माध्यमातून फक्त पुंड परिवाराचे किंवा नांदगावचेच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची शान वाढवली आहे. त्याच्या या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे आदित्यचे वडील अविनाश पुंड म्हणाले. बालपणापासून वडिलांसारखी देशसेवा करण्याचे माझे स्वप्न आहे, त्याच वाटेवर मला आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. आणि म्हणून मी दहावीच्या संपूर्ण वर्षात झटून अभ्यास केला.
मी दररोज फक्त चार तास अभ्यास करायचो सोबतच चित्रकला व फुटबॉल हे माझे छंदही जोपासायचो, असे आदित्य म्हणाला. आदित्यच्या या यशाबद्दल पसायदान प्रतिष्ठान नांदगावचे अध्यक्ष तथा वस्तू व सेवा कर उपयुक्त उज्जैन पुंड, माजी सरपंच बाळासाहेब सखाराम पुंड, ग्रामपंचायत सदस्य हेमलता नंदू सोनवणे, कृषी सहाय्यक संदीप वाघुले, संतोष वाघुले आदींनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.