आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली‎:शिवजयंतीला निघणार नागपूर‎ ते मुंबई इन्सानियत अभियान रॅली‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म-धर्मातील व समाजातील द्वेष‎ संपविण्यासाठी व प्रेम, शांतता आणि‎ भाईचार्याचा संदेश घेऊन नागपूर ते मुंबई‎ इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन‎ करण्यात आले असल्याची माहिती अल‎ इन्साफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष‎ मुफ्ती सालम चाऊस यांनी दिली.‎ शिवजयंतीच्या दिवशी रविवारी (१९‎ फेब्रुवारी) अल इन्साफ फाऊंडेशनच्या‎ वतीने नागपूर येथून इंन्साफ लाओ, देश‎ बचाओ, हिंदू-मुस्लिम नफरत मिटाओ, हे‎ ब्रीदवाक्य घेऊन इन्सानियत अभियान रॅली‎ काढण्यात येणार आहे.

तर ही रॅली १ मार्च‎ रोजी अहमदनगर शहरात दाखल होत‎ असून, याच्या नियोजनार्थ सर्जेपुरा येथील‎ रहेमत सुलतान सभागृहात बैठक पार‎ पडली. यावेळी मुफ्ती सालम बोलत होते.‎ या बैठकीला वाहद बिनसाले चाऊस,‎ मौलाना रियाज अहमद, वसीम सय्यद,‎ मुस्ताक सर, हाफिज फैजान आदी‎ उपस्थित होते.‎ मुफ्ती सालम म्हणाले, या इन्सानियत‎ अभियान रॅलीत राजकीय पक्ष व‎ धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या‎ स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत.‎ देशाच्या एकता, अखंडता व‎ एकात्मतेसाठी हे अभियान आहे.

पक्षीय‎ राजकारण बाजूला ठेऊन देशातील‎ शांततेसाठी सर्वांना या रॅलीत सहभागी‎ होण्याचे आवाहन करण्यात आले‎ असल्याचे त्यांनी सांगितले.‎ ही रॅली नागपूरहून अहमदनगर मार्गे‎ मुंबईला जाणार आहे. धर्मांधते विरोधात‎ इन्कलाबचा नारा असून, यामध्ये ४०‎ सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याची‎ सहमती दर्शवली आहे. अहमदनगर‎ शहरात देखील या रॅलीचे उत्साहात स्वागत‎ केले जाणार आहे. याचा समारोप मुंबईच्या‎ ऑगस्ट क्रांती मैदानात होणार असल्याचे‎ त्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...