आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:नागवडे कारखान्याने पंधरा दिवसांत 7326 शेतकऱ्यांना सभासद करावे, प्रादेशिक सहसंचालकांचे (साखर) आदेश

श्रीगोंदे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह.साखर कारखाना यांनी एप्रिल २०२१ मध्ये ७३२६ शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये १० हजार १०० घेतली होती. १६ महिने त्या सर्व शेतकऱ्यांना सभासद्व देण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.

श्रीगोंदे शिरूर तालुक्यातील तरुण शेतकरी भाऊसाहेब पवार, प्रशांत मगर, अभिषेक गिरमकर,सोमनाथ जाधव, रविंद्र मचाले, सिद्धेश्वर नांद्रे, सुनील जाधव,श्रीकांत मगर, महेश पवार, अनंत पवार व इतर शेतकरी गुरुवारी प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर कार्यालय पुढे उपोषणास बसले होते.

उपोषणाला बसल्यामुळे नागवडे कारखाना प्रशासन जागे झाले. सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम २२ (२) नुसार सर्व शेतकरी मानीव (डीमंड मेंबर)सभासद झाले आहेत.त्यानुसार मानवी सभासदांची सहकार कायदा नियम उपविधीनुसार कारखान्याने पात्र व्यक्तींची नावे ‘आय’ व ‘जे’ नोंदवही समाविष्ट करून सभासदांना सभासद क्रमांक व भाग दाखले पंधरा दिवसात देण्याचे लेखी आदेश प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी कारखाना प्रशासनास दिले. उपोषणादरम्यान सर्व शेतकऱ्यांनी जमा झालेल्या भाग भांडवल व प्रवेश प्रवेश फी ७.५१ कोटी रुपये गोळा झाले, त्याचे ३७ लाख रुपये व्याजाच्या रक्कमेचे काय झाले, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या निर्णयाची अंमलबजावणी कारखाना प्रशासनाने तात्काळ करावी, अशी मागणी उपोषणकर्ते पवार यांनी केली. सहसंचालक साखर अहमदनगर कार्यालयासमोर शेतरकऱ्यांनी उपोषण केले.

बातम्या आणखी आहेत...