आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर पंतप्रधान:माकपचे केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्ण प्रसाद यांचे मत

विजय पोखरकर | अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ वर्षांत जोडपी दर ५५ वरून १०७ वर आणणारे आतापर्यंतचे सर्वात दुबळे पंतप्रधान आहेत. कारण त्यांच्या काळात मध्यम वर्गीयासह गोरगरीब, शेतकऱ्यांना आणि शेतमजूर व कष्टांवर आधारीत कुटुंबांना सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. घरगुती वापराचे गॅस सिलिंडर ४१० रुपयांवरून १२०० रूपयेवर गेले आहे. पेट्रोल व डिझेल इंधन ७० रुपये लिटरवरून १२० रुपये लिटर झाले, असे प्रतिपादन माकपचे केंद्रीय कोषाध्यक्ष काॅम्रेड. पी. कृष्ण प्रसाद यांनी व्यक्त केले.

अकोले तालुक्यातील अंबिका मंगल कार्यालय तीन दिवस चाललेल्या किसान सभेच्या त्रेवार्षिक राज्य अधिवेशनात शेवटच्या सत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कृष्ण प्रसाद बोलत होते. व्यासपीठांवर किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावीत, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आदींसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे केंद्रीय व राज्य पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते. या अधिवेशनात काॅम्रेड डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, अर्जुन आडे यांनी संबोधित केले. त्याबरोबरच देशाची राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक, सामाजिक न्याय यांचे संरक्षण आणि संवर्धन कळीचे प्रश्न बनले असून शेतकऱ्यांना कायदेशीर व रास्त आधारभाव, कर्जमाफी, सर्वंकष पीक विमा योजना, वाढीव पेन्शन, सिंचन, वीज, रेशन व अन्नसुरक्षा अशा अनेक ज्वलंत प्रश्नावर विचारविनिमय करण्यात आला. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व इतर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्या करण्याच्या प्रश्नांवर भविष्यात संघर्ष करण्यावर एकमत करण्यात आले. किसान सभेच्या अधिवेशनास ४०० पदाधिकारी उपस्थित होते.

ओला दुष्काळ जाहीर करा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, उपविभागीय व तहसीलसमोर उपोषण करण्यात येणार असून २६ नोव्हेंबर रोजी मोर्चा आला.

बातम्या आणखी आहेत...