आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:नारीशक्ती सन्मान कार्यक्रमातून‎ महिलांचे सक्षमीकरण होईल ; वारे‎

नगर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम संघटनेच्या वतीने महिला‎ दिनानिमित्त घेण्यात आलेल्या‎ नारीशक्ती सन्मान सोहळ्यासारख्या‎ कार्यक्रमातून महिलांचे सक्षमीकरण‎ होईल, असा विश्वास नगरसेविका‎ रूपाली वारे यांनी व्यक्त केला.‎ सावेडी येथे अहमदनगर जिल्हा‎ शिवसंग्राम संघटनेच्या वतीने‎ शिवसंग्राम संपर्क कार्यालयात महिला‎ दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध‎ क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या‎ महिलांना नारिशक्ती सन्मान‎ सोहळ्यातून सन्मानित करण्यात‎ आले.

त्यावेळी वारे बोलत होत्या.‎ यावेळी शिवसंग्राम संघटनेचे नगर‎ जिल्हाध्यक्ष सुरेशराव शेटे पाटील,‎ केशवराव भनगे, त्रिंबक भदगले‎ संदीप खोत, बाबासाहेब नागौडे,‎ शुभम शेटे, शुभम बंग, बाळासाहेब‎ निपुंगे, निवृत्ती निपुंगे आदी यावेळी‎ उपस्थित होते. यावेळी रूपाली वारे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांच्या हस्ते महिलांचा सन्मान‎ करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ‎ लिविंगच्या जयश्री कोल्हे, सुनिता‎ घाडगे, बचत गटाच्या प्रमुख भाग्यश्री‎ नरवडे, आयुर्वेद क्षेत्रात काम‎ करणाऱ्या डॉ. अर्चना पागिरे, महसूल‎ सर्कल वृक्षाली कोरेशीम, तलाठी‎ सुनंदा आंधळे, सामाजिक कार्यकर्त्या‎ सुमन काळापहाड, आशा पटेकर‎ यांचा सन्मान करण्यात आला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

यावेळी सुरेशराव शेटे व त्यांच्या पत्नी‎ पुष्पा शेटे यांनी कार्यक्रमासाठी‎ उपस्थित महिलांचे स्वागत केले.‎ वारे म्हणाल्या,नारी शक्तीचा‎ सन्मान या सोहळ्यात महिलांच्या‎ केलेल्या सन्मानामुळे या महिलांना‎ आणखी बळ मिळेल. अशा‎ कार्यक्रमांमधून महिला शक्तींचा‎ विकास तसेच कुशलता वाढीस‎ लागणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...