आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Old Pension Scheme:जुन्या पेन्शनसाठी पाठपुरावा सुरुच ठेवणार, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांचे आश्वासन

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील तरुणांना अभिमान वाटेल, असे काम करणार आहे. सध्या मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघाचा दौरा सुरू आहे. मतदारसंघात पाच जिल्हे, ५४ तालुके, पाच हजार गावे आहेत. खूप मोठा मतदारसंघ आहे. तरी वर्षभरात सर्व दौरा करणार आहे. मतदारांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. याचबरोबर पगार खाते कोणत्या बँकेत ठेवायचे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा शुक्रवारी जामखेड येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी आले असता ल. ना. होशिंग विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, काँग्रेसचे अध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रदेश युवा सरचिटणीस राहुल उगले, सनराइज एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. संजय भोरे, डॉ. भरत देवकर, डॉ. प्रशांत गायकवाड, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल.डोंगरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सहसचिव पप्पू सय्यद, धनराज पवार माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. गायकवाड, सचिव रमेश बोलभट, विशाल डुचे, अमोल गिरमे, मयूर भोसले, विकास पवार, बी. ए. पारखे, मुख्याध्यापक डी. एन. साळवे आदी उपस्थित होते.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची बांधणी डॉ. सुधीर तांबे यांनी केली. यामुळे माझा विजय सोपा झाला. मतदारांना अभिमान वाटेल असे काम करून दाखवणार आहे. आपला देशच पुरोगामी आहे. यामुळे प्रगत आहे. आपण जातपात मानत नाहीत. आपल्या समाजसुधारकांनी आपला पुरोगामीचा पाया भक्कम केला. सर्वाना बरोबर घेऊन आपण चालतोय. काम करताना पक्ष कधीच पाहिला नाही. टीडीएफची खूप मदत झाली, असेही आमदार तांबे यांनी सांगितले.

यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे म्हणाले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यापेक्षा कामाचा आवाका आमदार सत्यजित तांबे यांचा जास्त आहे. जामखेड तालुका नेहमीच आपल्या बरोबर आहे. तरुणांचे आयडाॅल म्हणून आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे पाहिले जाते. आभार प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी मानले.