आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ ; काँग्रेस

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सक्कर चौक ते एसबीआय चौक या नवीन उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाण पुलाच्या खालील मार्गावर दुभाजक उभारताना ठराविक खाजगी आस्थापनांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दुभाजक उभारलेच नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांना निमंत्रण मिळणार आहे, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

काळे म्हणाले, नॅशनल हायवे ऑथरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) उड्डाणपुलाचे वेगाने काम करण्यात आले आहे. परंतु उड्डाणपुलाशी पूरक कामे चुकिच्या पद्धतीने करून नागरिकांच्या जीविताशी खेळू नये, अशी मागणी प्रोजेक्ट डायरेक्टर मिलिंद वाबळे यांच्याकडे केली आहे. मागणीचे पत्र ईमेलद्वारे पाठविले आहे. राजकीय दबावातून नागरिकांच्या जीविताशी खेळणारी गंभीर चूक केली आहे.

खाजगी फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करणे हे चुकीचे आहे. कायदा, नियम हे या देशातील प्रत्येक नागरिकासाठी समान आहेत. मात्र नगर शहरामध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, हे चुकीचे असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...