आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदरात कपात:‘नॅशनल पोस्टल’तर्फे गुणवंतांचा सत्कार ; नॅशनल पोस्टल सोसायटीची स्वभांडवलाकडे वाटचाल

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल सोसायटी उपलब्ध निधीमधून कमीत कमी व्याजदरात सभासदांना कर्ज उपलब्ध आहे, त्यामुळेच या संस्थेची ओळख स्वभांडवली संस्था म्हणून होत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे ज्येष्ठ सभासद व पोस्टल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष यादव यांनी केले. यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

पोस्टल सोसायटीची सभा राज पॅलेस कॉन्फरन्स हॉल येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा. चेअरमन नामदेव डेंगळे हे होते. संस्थेचे कार्यकारी संचालक सचिन गायकवाड यांनी सभेची नोटीस व आर्थिक पत्रके सभागृहापुढे ठेवली. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले. या सभेत संचालक मंडळाने कर्ज व्याजदरात अर्धा टक्का व्याज कपात करण्याची घोषणा ज्येष्ठ सभासद यादव यांनी केली. याप्रसंगी रामभाऊ लांडगे, एकनाथ ताकपेरे, कमलेश मिरगणे, गणेश धनक, अमित देशमुख, सहायक अधीक्षक डाकघर संदीप हदगल यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यकारी संचालक सचिन गायकवाड, राधाकिसन मोटे, रावसाहेब चौधरी, प्रकाश कदम, प्रदीप सूर्यवंशी, संजय बोदर्डे, संदीप कोकाटे, अरुण रोकडे, लक्ष्मीकांत दंडवते, नितीन थोरवे, दीपक नागपुरे, दीपक कुंभारे, अजित रायकवाड, सुनील थोरात, सागर कलगुंडे, विजय दरंदले, निलिमा कुलकर्णी, वासंती नगरकर, आश्विनी चिंतामणी, अर्चना भुजबळ, सविता ताकपेरे, मोनाली हिंगे, आरती भालेराव, प्रियांका भोपळे, वंदना नगरकर, धनंजय दैठणकर, सागर पंचारिया, प्रितम वराडे, अशोक बंडगर, आसिफ शेख, भाऊसाहेब जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...